Mango King

Home   /   सुंदरबन कृषी पर्यटन

सुंदरबन कृषी पर्यटन

सुंदरबन कृषी पर्यटन

पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्राइल सारख्या देशाने खूप मोठी प्रगती केली आहे,हे प्रकल्प आणि उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती साठी शेतकरी,विद्यार्थी शहरी लोक,परदेशी लोक  येत असतात तसेच श्री जे. डी. वाघेरे यांच्या मार्गदर्शनाने सुंदरबन कृषी पर्यटनाची निर्मिती झाली 

सुंदरबन कृषी पर्यटनाचा प्रमुख उद्देश :

१.  सुंदरबन कृषी पर्यटनामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामीण भागाचा विकास साधणे. 

२. कृषी पूरक व्यवसायाला चालना देणे. 

३. ग्रामीण भागातील लोककला ,संस्कृति व परंपरा शहरी व परदेशात पोहोचवणे 

४. ग्रामीण भागातील तरुणांना व महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे . 

५.शहरी भागातील व परदेशातील नगरिकाणांना शेती व शेती संलग्न व्यवसायाची माहिती देणे. 

६. शहरी भागातील व परदेशातील नगरिकाणांना प्रदूषणमुक्त,शांत,निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देणे.