Mango King

नर्सरी

आम्ही सुंदर-दामोदर नर्सरी आणि उमाई नर्सरी च्या माध्यमातून भारतातील शेकडो शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे विविध प्रकारचे रोपे उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या सेवा देत आहोत

फळबाग संशोधन केंद्र

श्री जे डी वाघेरे यांनी अनेक फळबागांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती केली त्यामध्ये अनेक फळाच्या जातींची लागवड केली.

सुंदरबन कृषि पर्यटन

पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्राइल सारख्या देशाने खूप मोठी प्रगती केली आहे,हे प्रकल्प आणि उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती साठी शेतकरी,विद्यार्थी शहरी लोक,परदेशी लोक येत असतात तसेच श्री जे. डी. वाघेरे यांच्या मार्गदर्शनाने सुंदरबन कृषी पर्यटनाची निर्मिती झाली


फार्मर-प्रोडूसर कंपनी(FPO)

श्री जे डी वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर फार्मर-प्रोडूसर कंपनी तयार करण्यात आली आहे सदर कंपनी मध्ये ग्रामीण भागातील गरीब ,कष्टकरी ,अल्प भू धारक शेतकरी सभासद म्हणून सहभागी आहेत आणि स्वतःचा विकास साधत आहेत..

फार्मर्स मार्गदर्शन केंद्र

श्री जे डी वाघेरे यांनी आत्ता पर्यंत किमान ५० हजार शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत व लाखो झाडांची लागवड होत आहे शेतकऱ्यांचा फायदा होत आहेच पण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न होत आहे..

बर्ड पार्क

सुंदर दामोदर बर्ड पार्क - २०२३ ला श्री जे डी वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. प्राकृतिक साधन संपत्तीचा परिपूर्ण अश्या नैसर्गिक लोकेशन वर विविध प्रकारचे पक्षी निसर्गाची लूट करण्यासाठी येत असतात.


मँगो रिसर्च सेंटर

श्री जे डी वाघेरे यांनी अनेक फळबागांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती केली त्यामध्ये अनेक फळाच्या जातींची लागवड केली आणि विशेष करून आंबा पिकामध्ये श्री जे डी वाघेरे यांनी खूप अभ्यास आणि संशोधन करून विविध जाती विकशित करून अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध करीत असतात

सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्र

सुंदर दामोदर कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून अत्यल्प दरात अत्यंत प्रभावी असे विविध नामांकित कंपनीचे रासायनिक आणि ऑर्गनिक शेतीसाठी लागणारे औषधे आणि खते उपलब्ध करून देतात.

मँगो प्लन्ट म्युझियम

श्री जे डी वाघेरे यांनी अभ्यास करून विविध जातीचे संशोधन करून एक म्युझियम तयार करण्यात येणार आहे त्या वर काम सुरू करण्यात आले आहे

इस्रायल व जर्मन तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती

भारतीय शेती व इस्रायलच्या शेती यामध्ये खुप मोठा फरक आहे इस्रायल शेतीचा अभ्यास मी जनार्दन दामोदर वाघेरे मु पो चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जि नाशिक येथे एका आदिवासी गावात याची सुरुवात २०१३ साली केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली व एक प्रमुख कारण लक्षात आले की पारंपरिक शेती मुळे येणारे उत्पन्न अती अल्प आहे व त्याच बरोबर फळबागांचे अंतर विद्यापीठांने जे ३० × ३० चे ठरवले आहे त्यामुळे गुंठ्यांत एक झाड बसते म्हणजे एका एकरात ४० झाडे व या ४० झाडांचे ३ टन उत्पन्न घ्यायचे असेल तर २० ते २५ वर्ष लागतात त्यामुळे वेळ खुप लागतो व फारसे काही हातात येत नाही याचं बरोबर इस्रायल,जर्मनी ,साऊथ आफ्रिका येथे कमी क्षेत्राच जास्त उत्पादन येते .....मग जर हे देश करु शकतात मग भारतीय का मागे याचा विचार करायला सुरुवात केली अनेक शेतकऱ्यांना भेटला या आनेक देशांच्या लागवडी बद्दल चर्चा केली परंतु कोणीही तयार झाले नाही शेवटी मीच माझ्या शेतात २०१३ साली 3×७ , फुटावर एकरी २१०० झाडे ,३×१० फुटावर १५०० झाडे ,३×१२ फुटावर १२२५ झाडे ,३× १४ फुटावर १००० झाडे असे अनेक प्रयोग केले सुरवातीला लोकांनी विरोध केला पण जेव्हा तीनच वर्षांत ३ ते ४ टन एकरी उत्पादन यायला सुरुवात झाली तेव्हा लोकांना आचर्याचा धक्का बसला आत्ता तुम्हाला वाटेल याचा आणि शेतकरी आत्महतेचा काय संबंध तर मित्रांनो संबंध आहे केशर आंबा फळबाग या दरवर्षी उत्पादन देत आहेत व टनेज मध्ये दरवर्षी वाढ होत आहे एखाद्या वर्षी जरी आसमानी संकटाने नुकसान झाले तरी झाड मात्र जीवंत असतात मी शेतकऱ्यांना आंबा उत्पादना बरोबर कलम कसे करावे याचे प्रशिक्षण देतो व शासनाची मान्यता घेऊन नर्सरी उद्योगात उतरवत आहे त्यामुळे एखाद्या वर्षी उत्पादन गेले तरी त्याला नर्सरी उद्योगातुन पैसे मिळतील व त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार येणार नाही असे मला वाटते त्याच बरोबर अल्प फी घेऊन इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती चे प्रशिक्षण वर्ग कसे घ्यावेत यांचे मार्गदर्शन करत आहोत मी दरवर्षी आमच्या बागेतील केशर नामधारी कंपनी मार्फत जपानला एक्सपोर्ट करतो दरवर्षी एकरी ४ ते ५ लाख रुपये कमावतो खर्च वजा जाता ३ते ४ लाख निव्वळ नफा शिल्लक राहतो तर मग महाराष्ट्रातील शेतकरयांना यांचा फायदा का होऊ नये म्हणुन हे तंत्रज्ञान मी देशभरातील शेतकरयांना मार्गदर्शन करत आहे यापुढे शेतकर्याचा माल प्रोसिसीग करुन जगभरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत आत्ता पर्यंत अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला व फायदा होत आहे

Read More...